VIDEO : बाबासाहेब अमर रहे ! नाशिकच्या रामकुंडावर बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थींचे विसर्जन - todays important news
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचे मंगळवारी विधिवत पूजेने रामकुंडात विसर्जन करण्यात आले आहे. बाबासाहेबांचे स्नेही साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठानचे विश्वस्त मकरंद कुलकर्णी यांच्या हस्ते विसर्जन झाले. या वेळी 'अमर रहे,अमर रहे बाबासाहेब अमर रहे' या घोषणा देण्यात आल्या. बाबासाहेबांच्या अस्थी अनेक गडांवर पाठवण्यात आल्या आहेत. नाशिकच्या स्नेहींना दर्शन घेता यावे या उद्देशाने मंगळवारी नाशिकला अस्थी आणण्यात आल्या होत्या. अस्थी विसर्जन करताना अश्रू अनावर झाल्याचं चित्र यावेळी बघायला मिळालं.आज त्यांच्या अस्थींचे रामकुंड येथे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले. यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज की जय, अमर रहे अमर रहे बाबासाहेब पुरंदरे अमर रहे, परत या परत या बाबासाहेब परत या अशी घोषणाही करण्यात आली. शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. शंभराव्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह देशभरातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.