गणेश विसर्जनाचे नियम पोलिसांनीच बसवले धाब्यावर; डिजेच्या तालावर धरला झिंगाट ठेका - ganesh festival news
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना गणेश विसर्जन अतिशय साध्या पद्धतीने करण्याचे आदेश होते. ढोल ताशांच्या गजरात वाजत विसर्जन मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र धामनगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील पोलिसांनीच पोलीस स्टेशनमधील गणपतीला निरोप दिला. त्यावेळी कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमी इतर गणेश मंडळांना घातलेल्या नियमांना स्वत: मात्र धाब्यावर बसवत डिजे लावून ताल धरल्याचा प्रकार समोर आला आहे. गणेश भक्तांनी हा सगळा प्रकार मोबाईल मध्ये कैद केला आहे. आता इतर गणेशभक्तांनी आणि मंडळांनी डिजेच्या तालावर नियम मोडणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार का ? असा सवाल केला आहे.