VIDEO :अखेर दहा दिवसांनी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू - amravati apmc
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13704570-678-13704570-1637580498300.jpg)
अमरावती - अमरावती शहरात 12 व 13 तारखेला झालेल्या हिंसाचारामुळे शहरात संचारबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे अमरावती मधील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यात आली होती. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा जबर फटका बसला होता. मात्र आता अमरावतीमध्ये संचारबंदी शिथिल करण्यात येत आहे .त्याच पार्श्वभूमीवर तब्बल दहा दिवसानंतर आज प्रशासनाने अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती उघडण्यास परवानगी दिल्यामुळे पुन्हा आज कृषी उत्पन्न बाजार समिती गजबजून गेली आहे .जिल्हाभरातील हजारो शेतकऱ्यांनी आपला शेतमाल येथे आज विक्रीसाठी आणला होता.