VIDEO : कलाकाराने कलाकारांच्याच हिशोबाने बोलावं - अभिनेता रमेश परदेशी - etv bharat live
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. देशाला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ सालामध्ये मिळालं आहे. नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे कंगना पुन्हा एकदा वादात सापडली आहे. या कंगनाच्या वक्तव्याची सर्वत्र टीका होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष अभिनेते रमेश परदेशी यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. 'कलाकाराने हे कलाकाराच्याच हिशोबाने वक्तव्य करायला हवं. त्यांनी कोणत्याही राजकारणी वक्तव्य करू नये. मध्यंतरी जे काही देशात अभिव्यक्ती स्वतंत्र नाही हे बोलले जात होते. पण त्यांच्या या वक्तव्यावरून असं वाटत आहे की लोकशाही आहे.पण विधान हे जबाबदारीनेच केलं पाहिजे. कारण आपण काय बोलत आहे हे लोक ऐकत असतात आणि कलाकाराला मोठ्या प्रमाणात फॉलो देखील केलं जातं त्यामुळे कलाकाराने हे कलाकाराच्याच हिशोबाने बोलावं असं मत यावेळी मुळशी पॅटन फेम अभिनेता रमेश परदेशी यांनी व्यक्त केलं आहे.