VIDEO : : अमरावतीत नियमांची पालमल्ली करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई - amaravati police checking
🎬 Watch Now: Feature Video

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नविन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पर्यटनस्थळी जात आहे. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाने निर्बंध लागू केले आहे. त्या अनूषंगाने अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणे, विना मास्क फिरणे तसेच निर्बंधांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.