Nandur Madhameshwar Canal : नांदूर- मधमेश्वर जलदगती कालव्यात रसायनयुक्त पाणी.. शेतकरी, पशुधनाचे आरोग्य धोक्यात - वैजापूर- गंगापूर लाभक्षेत्र

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 16, 2022, 3:22 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

वैजापूर (औरंगाबाद) : नांदूर- मधमेश्वर जलदगती कालव्यात ( Nandur Madhameshwar Canal ) रब्बी सिंचनासाठी सोडलेल्या पाणी आवर्तनात रसायन मिश्रित पाणी ( Chemically Mixed Water ) वाहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पाण्यामुळे वैजापूर- गंगापूर लाभक्षेत्रातील ( Vaijapur-Gangapur Beneficiary Area ) शेतकरी, पशुधनासह पिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. कालव्यात काळसर रंगाचा पाणी प्रवाहाचा विसर्ग होत असल्याप्रकरणी नांदूर- मधमेश्वर विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांच्याशी संपर्क साधला असता सदरील पाण्याचे सॅम्पल चाचणीसाठी पाठवले आहे. रिपोर्ट आल्यावरच ह्या प्रकरणी बोलणे योग्य असेल असे गुजरे म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.