Celebrate Holi with Inflation erupts : येवल्यात पेटवली महागाईची होळी - नाशिक
🎬 Watch Now: Feature Video
येवला (नाशिक) - येवला शहरातील लोणार गल्लीत अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली असून यावेळी पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका, वाढती महागाई, खाद्यतेलाची दरवाढ, महागाईमुळे सण-उत्सव साजरे करण्यास फटका, दाळ दरवाढ असे विविध फलक होळीला लावत होळी पेटवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने होळी सण साजरा करण्यात आला. यावेळी शहरवासीयांनी ही महागाई लवकरात लवकर कमी करावी याकरता महागाईच्या भस्मासुराचा चित्रदेखील काढून या होळीत जाळून आपला होळी सण साजरा केला. वाढत्या महागाईमुळे नागरिक पूर्णपणे होरपळून निघाला असून ही महागाई लवकरात लवकर कमी करावी याकरता नागरिकांनी महागाईची होळी केली असून वाढणारी महागाई नागरिकांनी होळीत जाळून टाकत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST