पंजाब नॅशनल बँकेसह दहा सरकारी बँकांचे विलिनीकरण; निर्मला सीतारामन यांची घोषणा - Alahabad Bank
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली. यामध्ये दहा सरकारी बँकांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यामध्ये नीरव मोदीने फसवणूक केलेल्या पंजाब नॅशनल बँकेचाही समावेश आहे. सरकारी बँकांंच्या संचालक मंडळासह व्यवस्थापकीय संचालकांना अधिक अधिकार देण्यात येणार असल्याचेही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला यांनी सांगितले.