VIDEO : भिंतीआड कुत्र्यांना जिवंत गाडले; बोरीवलीतील धक्कादायक प्रकार - Bury the alive dogs behind wall in Borivali
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बोरिवलीच्या विसी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पौर्णिमा शेट्टी दररोज जवळपास बोरिवली पश्चिमेत 300 भटक्या कुत्र्यांना आणि मांजरीला जेवण देतात. मात्र, बोरीवली येथील देविदास लेनवर त्या काल नेहमीप्रमाणे आल्यानंतर त्याठिकाणी 20 ते 22 कुत्रे गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आल. त्यानंतर पौर्णिमा आजूबाजूला पाहणी केली असता अँक्लीविरा ग्रँडच्या पार्किंगच्या बाजूच्या मोकळ्या जागेत भिंत रचून त्या कुत्र्यांना जिवंत गाडून टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे लक्षात येतात प्राणी प्रेमींनी हातोड्याच्या सहाय्याने भिंती तोडून सर्व कुत्र्यांना बाहेर सुखरूप काढले. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात ( MHB Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST