नात्याला काळिमा.. जन्मदात्या आईवर मुलाचा अत्याचार, वणी तालुक्यातील घटना - तरुणाचा आईवर बलात्कार
🎬 Watch Now: Feature Video

वणी तालुक्यातील ब्राह्मणी शिवारात आपल्या जन्मदात्रीला वासनेची शिकार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घडलेल्या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आरोपीला पीडित मातेच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अटक केली आहे.
27 वर्षीय नराधम अविवाहित होता. त्याला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी तो मद्यधुंद अवस्थेत घरी पोहचला. मध्यरात्री त्याची नियत फिरली, जन्मदात्री एकटीच झोपलेली असताना तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. स्वतःच्या मुलानेच असले अश्लील व घृणास्पद कृत्य केल्याने त्या मातेने भल्या पहाटे विष प्राशन केले. गंभीर अवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती स्थिर होताच तिने थेट पोलीस स्टेशन गाठले. आपल्यावर घडलेली आपबिती तिने कथन केली. ठाणेदार वैभव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य बघता तात्काळ गुन्हा नोंद केला. आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण नाकतोडे करीत आहेत.