मंदिरात रील्स करणे तरूणीला पडले महागात; पुजाऱ्यांनी केला गुन्हा दाखल - मंदिरात रिल्स बनवतांनाचा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
उज्जैन (मध्यप्रदेश) - शहरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या महाकाल मंदिर परिसरात एका हिंदी गाण्यावर रील्स बनवतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील महिलेच्या विरोधात महाकाल मंदिरातील पुजाऱ्यांसह हिंदू संघटनांनी गुन्हा दाखल केला आहे.
मध्यप्रदेशातील उज्जैन येथील महाकाल महादेव मंदिर परिसरात इंस्टाग्रामवर रिल्स केलेला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तरूणी मंदिरात एका व्हिडिओ गाण्यावर थिरकतांना दिसून येत आहे. या व्हिडिओवर पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला असून त्यांनी उज्जैन येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. मंदिरात रिल्स करणे त्या तरूणीला चांगलेच महागात पडले आहे.
Last Updated : Oct 9, 2021, 7:32 PM IST