Bigg Boss 15: भेटा बिग बॉसच्या घरात धमाका करण्यासाठी सज्ज झालेल्या 10 स्पर्धकांना - बिग बॉस लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पुन्हा एकदा बिग बॉस या शोचे शूटिंग मुंबईच्या गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये होत आहे. या झिझनची थीम 'संकट इन जंगल' अशी आहे. आतापर्यंत शोच्या निर्मात्यांनी 10 स्पर्धकांच्या यादीला दुजोरा दिला आहे. हे स्पर्धक 2 ऑक्टोबरपासून कलर्सवर प्रसारित होणाऱ्या शोमध्ये प्रवेश करणार आहेत. स्पर्धक 24x7 कॅमेऱ्याच्या सतर्कतेखाली असतील. 15 वर्षात प्रथमच बिग बॉस ओटीटीसह डिजिटल झाला. या शोचा निर्माता करण जोहर होता. बिग बॉस ओटीटी स्पर्धेत दिव्या अग्रवाल विजेती ठरली होती.