Goa CM BPJ Candidate : गोवा मुख्यमंत्री निवडीवर देवेंद्र फडणवीस यांची 'ईटीव्ही भारत'सोबत खास मुलाखत - गोवा विधानसभा निवडणूक
🎬 Watch Now: Feature Video
पणजी (गोवा) - राज्यात विधानसभा निवडणूक ( Goa assembly election 2022 ) पार पडल्यानंतर सोमवारी भाजपने डॉ. प्रमोद सावंत यांची पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्री पदी निवड ( Goa CM BJP Candidate Dr Pramod Sawant ) केली. त्यानंतर भाजपा नेते आणि आमदारांनी राज्यपाल इ श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी भाजपच्या 20 आमदारांसह 3 अपक्ष आणि मगोच्या 2 आमदारांनी देखील पाठिंबा दर्शविला. दरम्यान भाजपला राज्यात 20 जागा मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली ती निवडणूक प्रभारी म्हणून काम केलेल्या देवेंद्र फडणवीस. भाजपने सोमवारी सत्ता स्थापन केल्याचा दावा केल्यानंतर फडणवीस यांनी 'ईटीव्ही भारत'शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी राज्यात विधानसभा निवडणूक ते डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्री पदाची निवड कशी झाली याची सविस्तर माहिती दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST