कोरोना लस घेण्याकरिता टाळाटाळ; नाग दाखवून आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकाविले! - कोरोना लस भीती
🎬 Watch Now: Feature Video
जयपूर - अज्ञानामुळे कोरोना लसीकरणाची आजही ग्रामीण भागात भीती आहे. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्याच्या नागेलाव गावात एका महिलेने तर हद्दच केली. कोरोना लसीकरणासाठी गेलेल्या पथकाला कालबेलिया समाजातील महिलांनी विरोध केला. लसीकरणाला विरोध करत महिलेने चक्क नाग हातात घेऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकाविले. तरीही हे कर्मचारी घाबरले नाहीत. त्यांनी महिलांची समजुत काढली. अखेर त्यांनी सर्वांना कोरोना लस दिली आहे.