सूरत : जामिनानंतर दारूमाफियाने काढली महागड्या गाड्यांची रॅली; व्हिडिओ व्हायरल - दारूमाफिया जामीन
🎬 Watch Now: Feature Video
सूरत - सूरतमधील एका दारूमाफियाला जेलमधून जामिन मिळाल्यानंतर त्याने आपल्या मित्रांसोबत महागड्या गाड्या घेऊन रॅली काढली. या रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पलसाना कडोदरा येथील हा दारूमाफिया असून, ईश्वर वासफोडिया असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. त्याने काढलेल्या रॅलीमध्ये जॅग्वार, मर्सिडीज, ऑडीसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. या प्रकारानंतर नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.