TWO BUILDINGS COLLAPSED IN AP : आंध्रप्रदेशात दोन इमारती कोसळल्या, 3 मरण पावले, बचावकार्य सुरू - आंध्रप्रदेशात मुसळधार पाऊस
🎬 Watch Now: Feature Video
अनंतपूर : जिल्ह्यातील जुन्या चेअरमन गल्लीतील कादिरी येथे बांधकाम सुरू असलेल्या दोन इमारती कोसळल्या (TWO BUILDINGS COLLAPSED IN AP). या घटनेत दोन मुले आणि एका महिलांचा मृत्यू ( 3 DIED in BUILDINGS COLLAPSED AP) झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले होते. एक इमारत कोसळली आणि त्याखालील दुसऱ्या इमारतीवर पडली. त्यामुळे इतर इमारतींचीही पडझड झाली. अधिकार्यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केले आहे. एका घरात आठ तर दुसऱ्या घरात सात जण असे एकूण १५ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. 15 पैकी 6 जण सुखरूप बचावण्यात आले आहे. अतिरिक्त एसपी रामकृष्ण प्रसाद (Additional SP Ramakrishna Prasad), आरडीओ वेंकट रेड्डी घटनास्थळाची पाहणी करत आहेत.