कोकोनट किंग; फक्त नारळ तो़डून ते दोघं कमवतात महिना ६० ते ८० हजार रुपये - मंगळुरु कर्नाटक न्यूज
🎬 Watch Now: Feature Video

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दरमाहा चांगले वेतन मिळते. मात्र, मंगळुरुचे दोन व्यक्ती नारळ तोडून महिन्याकाठी ६० ते ८० हजार रुपये कमवत आहेत. विठ्ठल गौडा आणि अनुष अशी दोघांची नावे आहेत. विठ्ठल कर्नाटकातील सूळ्या तालुक्यातील मुरुळ्या कदीरा गावातील रहिवासी आहेत तर अनुष सूरतकाल इथले रहिवासी आहे. हे दोघंही एका साधनाच्या मदतीने झाडावर चढतात आणि अगदी सहजरित्या नारळ तोडतात. हे दोघे रोज ६० ते ८० झाडांवर चढून नारळ तोडतात. कृषी विज्ञान केंद्र विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका प्रशिक्षण कार्यक्रमाने विठ्ठल आणि अनुषचे आयुष्यच बदलून टाकले. या कार्यक्रमाचं नाव आहे, 'टेंगिना मारा स्नेही’ ज्याचा अर्थ आहे, फ्रेंडली कोकोनट ट्री, नारळ आणि त्याच्या झाडापासून मिळणारे लाभ. या कार्यक्रमात नारळाच्या झाडावर चढणे आणि नारळ तोडण्याचे साधन बनवणे शिकवण्यात आले होते. या दोघांना पूर्वीपासूनच नारळ तोडण्याचा अनुभव होता. त्यामुळे प्रशिक्षण मिळाल्यानंतर ते यात तरबेज झाले आहेत.