भररस्त्यावर धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून, पाहा घटनेचा व्हिडिओ - bangalore crime
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरू - बंगळुरू येथील अवालहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दील एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला आहे. 25 सप्टेंबर रोजी घडली असून घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. व्यंकटेश कुल्ला, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
व्यंकटेश हा एका दुचाकीवरुन घरुन राममूर्ती नगर येथे निघाला होता. त्यावेळी एक रिक्षा अचानक त्याच्या दुचचाकीच्या समोर आली. त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो खाली कोसळला. त्यावेळी रिक्षातून आलेल्या व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करुन व्यंकटेशची हत्या केली.
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अनिलसह चौघांना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे.