VIDEo भरधाव वेगातील चारचाकीने रस्त्यावरील नागरिकांना चिरडले; 1 जण जागीच ठार, 9 गंभीर - jodhpur latest news
🎬 Watch Now: Feature Video
जयपूर - जोधपूर शहरातील चौपासनी हाउसिंग बोर्ड ठाणे परिसरातील एम्स रोडवर भीषण अपघात झाली आहे. भरधाव वेगातील आलिशान चारचाकी वाहनाने रस्त्यावरील अनेकांना चिरडले. ही चारचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीत घुसली. या अपघातात 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहेत. तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर इतर जखमींना 50 हजार रुपयांची तत्काल मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.