हिमाचल प्रदेशमध्ये महिला सशक्तीकरणाचं प्रतिक ठरत असलेल्या 'तवारकू देवी' - tavarku devi himachal pradesh news
🎬 Watch Now: Feature Video

मंडी (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील तवारकू देवी या येथील स्थानिक महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहेत. एमए पदवीधर असलेल्या तवारकू यांनी घरातील टाकाऊ वस्तू आणि पाईन वृक्षाच्या पानांपासून नवनवीन साहित्य तयार करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याला प्रतिसाद मिळू लागला आणि त्यांच्या घरची आर्थित परिस्थीतीही सुधारू लागली. यानंतर, एक-एक करत महिला त्यांच्याशी जुळत गेल्या आणि त्यांनी एक गट स्थापन केला. या गटाच्या माध्यमातून आज कित्येक महिलांना रोजगार प्राप्त होत आहे.