कर आकारणी कायदा (सुधारणा) विधेयकावर खासदार सुप्रिया सुळे म्हणतात... - कर आकारणी कायदा लोकसभा
🎬 Watch Now: Feature Video

नवी दिल्ली - लोकसभेत कर आकारणी कायदा (सुधारणा) विधेयक, २०१९ वरील चर्चेत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाग घेतला. यावेळी बोलताना जीएसटीच्या अंमलबजावणीबाबत येणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित करत, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावल्याचा मुद्दाही त्यांनी या भाषणात नमूद केला.
तसेच वित्तीय तूट आणि अन्नधान्याची महागाई रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे? अशा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सरकारला विचारला. त्याचबरोबर एकात्मिक थेट कर सुधारणा आणण्याबाबत उपाययोजना करावी, असे सुळेंनी सुचवले.