कुंभमेळ्यानिमित्त हरिद्वारमधील गायत्री परिवाराचे विशेष अभियान - हरिद्वार गायत्री कुटुंब विशेष अभियान
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - महाकुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक-सांस्कृतिक मेळा आहे. एकदा तरी या कुंभमेळ्यात सहभागी होण्याची प्रत्येक हिंदूची इच्छा असते. सध्या कोरोना महामारीमुळे जगभरातील सर्व व्यवस्था कोलमडली आहे. आपल्या इच्छेप्रमाणे आपण कुठे जाऊ शकत नाही. यावेळचा कुंभमेळा हरिद्वारमध्ये होत आहे. इच्छा असूनही अनेकांना कुंभमेळ्यात जाता येणार नाही. अशा लोकांसाठी शांतिकुंजच्या गायत्री परिवाराने 'आपके द्वार पहुँचा हरिद्वार' हे अभियान सुरू केले आहे.