सब-लेफ्टनंट शिवांगीने रचला इतिहास; बनली भारतीय नौदलाची पहिली 'महिला पायलट' - lieutenant Shivangi
🎬 Watch Now: Feature Video
मुझफ्फरपूर (बिहार) : भारतीय नौदलात पहिली महिला पायलट बनण्याचा मान सब-लेफ्टनंट शिवांगी यांनी कमावला आहे. भारतीय नौदलातील एव्हिएशन विभागात हवाई वाहतूक नियंत्रण विभागात महिला अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश असतो. परंतु, शिवांगी ही नौदलातील महिला पायलट ठरली आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील फतेहाबादमधील येथील शिवांगीला लहापणापासूनच पायलट बनन्याची इच्छा होती. तिच्या या स्वप्नांना पालकांनी पाठिंबा दिला आणि शिवांगीने तिचे स्वप्न सत्यात उतरवले.