'कोरोनाने पोलिसांच्या कामाचे स्वरुप बदलले', मराठमोळे पोलीस आयुक्त महेश भागवत यांची खास मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद- देशावर कोरोना महामारीचं संकट आलंय. या कठीण काळात पोलिसांचं काम अनेक पटीनं वाढलंय. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांच्या समस्याही त्यांना सोडवाव्या लागत आहेत. एकूणच कोरोना आणीबाणी पोलीस कशी हाताळतायेत, या विषयी ईटीव्ही भारतने हैदराबादमधील राचाकोंडा विभागाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्याशी चर्चा केली. 'कोरोनामुळे पारंपरिक पोलिसिंग बदलली असून वर्दीतल्या पोलिसांचा मानवी चेहरा समोर येतोय. नागरिकांना दिलासा देण्याची गरज असून त्यांनी संयम पाळावा', असे आवाहन त्यांनी केले आहे. राचाकोंडा पोलिसांतर्फेही गरजवंतासाठी अनेक उपक्रम सुरू आहेत. पाहा संपूर्ण मुलाखत ईटीव्ही भारतवर...
Last Updated : May 1, 2020, 12:15 PM IST