'भारत बंद'वरुन जावडेकरांनी विरोधकांना सुनावले खडे बोल; पाहा Exclusive मुलाखत..
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील सुमारे १२ विरोधी पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, असे करणे हा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा दांभिकपणा असल्याचे म्हणत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी यावर टीका केली आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सुरुवातीलाच कृषी कायद्यांमध्ये बदल आणण्याचे आश्वासन दिले होते. जर काँग्रेस करेल तर ठीक आणि पंतप्रधान मोदी करतील तर ते चुकीचे, असा पवित्रा विरोधी पक्षांनी घेतल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याच विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या काही राज्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग लागू करण्यात आले आहे, इथेच यांचा दांभिकपणा उघड पडतो, असेही जावडेकर म्हणाले. पाहा त्यांची संपूर्ण Exclusive मुलाखत...