VIDEO : विमानातून फिरणारे आमदार बसले बैलगाडीत, अन् गेला तोल; पाहा व्हिडिओ.. - जामताडा आमदार बैलगाडी व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video

रांची : झारखंडच्या जामताडामधील आमदार इरफान अन्सारी यांना बैलगाडीमध्ये बसणं चांगलच महागात पडलं. एरवी लग्जरी कार आणि विमानातून फिरण्याची सवय असणाऱ्या अन्सारींना बैलगाडीमध्ये आपला तोल सावरता आला नाही, आणि ते धपकन खाली पडले. यानंतरची बैलगाडीतील सवारी त्यांनी चक्क बैलगाडी चालवणाऱ्याला पकडून, गुडघ्यांवर उभे राहत पूर्ण केली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे...