शेतातील उत्पादनवाढीसाठी फायदेशीर ठरयेत चित्तूरमधील ही 'मिलेट बँक' - तृणधान्याची शेती चित्तूर बातमी
🎬 Watch Now: Feature Video
चित्तूर (आंध्र प्रदेश) - चित्तूर जिल्ह्यातील कुप्पमजवळच्या एमकेपुरममध्ये ही मिलेट बँक आहे. या गावाशी नाते जुळून असल्याने विशाला यांनी येथे ही बँक स्थापन केली. आधी त्या हैदराबादबाहेरील उद्योजकांना प्रशिक्षण द्यायच्या. मात्र, आता बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहयोग करण्याच्या उद्देशाने त्या मूळगावी परतल्या आहेत. जे शेतकरी पूर्वी बार्ली, बाजरी, भगर आणि बर्नयार्डसारख्या पिकांचे उत्पादन घेत होते ते हळूहळू व्यावसायिक पिकांवर आपले लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्याच्यावर उपाय म्हणूनच विशाला यांनी या बँकेची स्थापना केली. पाण्याचे स्त्रोत कमी असलेल्या ठिकाणी कशाप्रकारे उत्पन्न घेता येईल यासाठी कार्यशाळा घेणे सुरू केले. या सोबत अनुभवी शेतकऱ्यांची पद्धत आणि कार्यशैली नव्या शेतकऱ्यांसाठी कसे फायदेशीर ठरेल याबाबतही त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकरीही जैवीक पद्धतीने केलेल्या शेतीतून उत्पन्न मिळवण्याकरता कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार वाटचाल करत आहेत. तर, मिलेट बँकही शेतकऱ्यांच्या या प्रयत्नाची पूर्ण परतफेड कशी होऊ शकेल याकरता प्रयत्नशील आहे.