VIDEO : रस्त्यावरच उलटला दुधाचा टँकर; लुटण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी.. - Rajasthan News
🎬 Watch Now: Feature Video
जयपूर : राजस्थानमध्ये जयपूर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर दुधाचा टँकर पलटून मोठा अपघात झाला. या अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. मात्र, टँकरचे झाकण उघडले गेल्यामुळे रस्त्याच्या कडेने दुधाची नदी वाहू लागली होती. याबाबत माहिती मिळताच आजूबाजूच्या गावामधील लोकांनी याठिकाणी येत दूध भरुन नेण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही वेळाने पोलिसांनी याठिकाणी येत गर्दीवर नियंत्रण मिळवले. तसेच क्रेनच्या मदतीने टँकर बाजूला करुन वाहतुकही सुरळीत केली...