पेन्सिलीच्या टोकावर शिवलिंग साकारणारा अवलिया; पाहा व्हिडिओ - पेन्सिलीच्या टोकावर शिवलिंग साकारणारा अवलिया
🎬 Watch Now: Feature Video
भुवनेश्वर - महाशिवरात्रीच्या निमित्ताने ओडिशामधील सुप्रसिद्ध मिनिएचर आर्टिस्ट (सूक्ष्म कलाकृती करणारा) एल ईश्वर राव याने पेन्सिलीच्या टोकावर शिवलिंग साकारण्याची किमया केली आहे. हे शिवलिंग केवळ ०.५ इंचाचे आहे. यापेक्षा लहान शिवलिंग आपण कोठे पाहिले असेल असे वाटत नाही. एका छोट्या काचेच्या डब्यात त्याने हे शिवलिंग ठेवले आहे. एल ईश्वर राव हा भुवनेश्वरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या जातनी गावचा रहिवासी आहे.