मोदी सरकारने कलम ३७० सोबतच काँग्रेसने काश्मीरमध्ये सुरू ठेवलेला दहशतवाद संपवला - अशोक पंडित - Interview on Abrogation of article 370
🎬 Watch Now: Feature Video
५ ऑगस्ट २०१९ला, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत असताना, काश्मीरमधील परिस्थिती कशी आहे हे जाणून घेणे आवश्यक ठरते. यासंदर्भात ईटीव्ही भारतने सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित यांच्यासोबत चर्चा केली आहे. पंडित हे अखिल भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेचे अध्यक्ष आहेत. काश्मीरसंदर्भात बोलताना ते म्हणाले, की कलम ३७० हटवण्याचा कठोर निर्णय घेत, मोदी सरकारने काश्मीरमधील काँग्रेस-समर्थनात सुरू असलेला दहशतवाद थांबवला आहे. या निर्णयामुळे आता काश्मिरी युवकांच्या हातात बंदुक नाही, तर काम आले आहे. शिवाय तेथील निरापराध स्थानिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पाहूयात ही विशेष मुलाखत...