यंदाची दिवाळीही होणार लखलखणारी; ज्वेलरी शॉप्सनी दिल्या विविध ऑफर्स - ज्वेलरी शॉप न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9514194-341-9514194-1605099987115.jpg)
कोरोनामुळे लोकांचे दैनंदिन जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. मात्र, सध्या सणासुदीच्या वातावरणामुळे लोकांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण आले आहेत. दसरा झाल्यानंतर आता लोक बाकी सर्व विसरुन दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या तयारीस लागले आहेत. या सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, सध्या सर्व व्यवसाय पूर्वपदावर येत असले, तरीही लोकांनी सोनेखरेदीकडे पाठ फिरवली आहे. असे असले तरी, ज्वेलरी शॉपमालकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहेत. कारण त्यांनी ग्राहकांनी आकर्षित करण्यासाठी डिस्काऊंट आणि विविध ऑफरही देऊ केले आहेत. पाहा ईटीव्ही भारतचा विशेष वृत्तांत...
Last Updated : Nov 11, 2020, 7:31 PM IST