पतीच्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या 'वाघ विधवां'चा जगण्यासाठीचा संघर्ष - helpless widow in sundarbans news

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 6, 2020, 7:56 PM IST

सुंदरबन (पश्चिम बंगाल) - सुंदरबनमधल्या हजारो स्त्रियांना वाघाच्या हल्ल्यामुळे वैधव्य आले आहे. पूर्व भारतातला चार हजार दोनशे चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला हा खोऱ्याचा प्रदेश जगातल्या सर्वात मोठ्या खारफुटी आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या जंगलातील वाघ हे या परिसरातील ग्रामस्थांचा कर्दनकाळ ठरत आहेत. आपल्या रोजच्या गरजा आणि उपजीविकांसाठी जंगलांवर अवलंबून राहणाऱ्या गावकऱ्यांना जंगलात जाऊन मासे, खेकडे धरण्याचे किंवा मध, लाकूड गोळा करण्याचे काम सहसा पुरुष करतात. त्यामुळे वाघाचा सामना झालाच तर पुरुषाचांच जीव जातो. त्यात जर का माणसांचा जंगलाच्या कोअर भागात मृत्यू झाला असेल तर परिस्थिती आणखी बिकट होते. कारण गावकऱ्यांना त्या भागात प्रवेश नाही, त्यामुळे कित्येक लोकांचे मृतदेहदेखील सापडले नाहीत. वाघांचे हल्ले आणि ग्रामस्थांचा मृत्यू हे आता रोजचेच झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.