कलेची आवड असणारा 'खाकी वर्दीतला शिल्पकार' - sculpture police officer
🎬 Watch Now: Feature Video
कोल्लम (केरळ) - प्रत्येक माणसात एक कलाकार दडलेला असतो. काहीजण त्यांच्यातील कलेला जोपासतात, त्यात आपले करिअर करतात. तर, काहीजण नवीन मार्ग शोधतात. पण, आपल्या कार्यासह तेवढ्या जोमाने आवड जपणारे काही क्वचितच लोक आहेत. केरळच्या कोल्लम येथील पोलीस अधिकारी गुरुप्रसाद अय्यपनही त्यातील एक. पोलीस अधिकाऱ्याची भूमिका चोखपणे बजावतनाच गुरुप्रसाद यांनी त्यांच्यातील कलेला जीवंत ठेवले. ते एक उत्कृष्ठ शिल्पकार आहेत. त्यांनी तयार केलेले अनेक शिल्प उत्तर केरळच्या कासरगोडपासून दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत विविध ठिकाणी प्रस्थापित आहेत. त्यांनी त्यांच्या कलाकृतींसाठी तीन ललितकला अकादमी पुरस्कारही जिंकले आहेत. यासह २०१७ मध्ये चोखपणे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री पोलीस पदकही देण्यात आले.