10 रुपयांच्या पैजेपायी गमावली 80 हजारांची दुचाकी, पाहा VIDEO - मध्य प्रदेश पूर
🎬 Watch Now: Feature Video
सतना : पुराच्या पाण्यातून दुचाकी काढून दाखविण्यासाठी लावलेल्या 10 रुपयांच्या पैजेपायी 80 हजारांची दुचाकी गमावण्याची वेळ एकावर आल्याची घटना मध्य प्रदेशातील सतनामधून समोर आली आहे. येथील एका नाल्याला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना त्यातून दुचाकी काढून दाखविण्यासाठी दहा रुपयांची पैज लावल्यानंतर युवकांनी दुचाकी पाण्यात टाकली. मात्र पाण्याच्या वेगापुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि गाडीसह तेही वाहून जायला लागले. यावेळी त्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी दुचाकी सोडून दिली आणि पाण्याबाहेर आले. मात्र दुचाकी पाण्यासोबत वाहून गेली. त्यामुळे दहा रुपयांच्या पैजेपायी 80 हजारांची दुचाकी गमावण्याची वेळ आल्याचेच इथे दिसून आले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.