प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून ऐका उत्तराखंड दुर्घटनेची आपबीती; पाहा व्हिडिओ.. - चमोली दुर्घटना
🎬 Watch Now: Feature Video
देहराडून : सात फेब्रुवारीला उत्तराखंडच्या तपोवनमध्ये महाप्रलय आला होता. या प्रलयाचा व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेल्या व्यक्तीशी ईटीव्ही भारतने संवाद साधला. रैणी गावातील मनवर सिंह यांनी सर्वात हा संपूर्ण प्रलय प्रत्यक्ष पाहिला होता. त्यांनी सांगितले, की सात फेब्रुवारीला सकाळी ते आपल्या ऑफिसला जात असताना त्यांना लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. यावेळी त्यांना वाटले की भूस्खलन झाले असावे, मात्र डोंगरावर जाऊन पाहताच त्यांना समोरुन मोठ्या प्रमाणात पाण्याच्या लाटा येताना दिसल्या. पाहूयात कसा होता त्यांचा हा थरारक अनुभव...