रायपूर रेल्वे स्थानकावर स्फोट; सीआरपीएफचे चार जवान जखमी - रायपूर सीआरपीएफ न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
रायपूर - रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये स्फोट झाला आहे. यात 4 सीआरपीएफ जवान जखमी झाले. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. गंभीर जखमींना रायपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डेटोनेटर स्फोटामुळे हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. सीआरपीएफच्या 211 बटालियनचे जवान विशेष ट्रेनने जम्मूला जात होते. रायपूर येथे गाडी थांबल्यानंतर हा ग्रेनेड डमी काडतूस बॉक्समध्ये ठेवला जात होता. या दरम्यान स्फोट झाला.