कोरोना मीटर : जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा ३० लाखांवर, तर देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण - corona update
🎬 Watch Now: Feature Video
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. ३० लाख ६४ हजार ८९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २ लाख ११ हजार ६०९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याबरोबरच देशात देखील कोरोनाने पाय पसरले आहेत. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण ८ हजार ५९० आहेत, तर त्यापाठोपाठ गुजरात, दिल्ली आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक कमी रुग्ण मिझोरम आणि अरुणाचलप्रदेशमध्ये आहेत, तर सिक्कीमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. पाहुयात यासंदर्भातील ईटीव्ही भारतचा रिपोर्ट....