सारनाथ येथे बुद्ध पौर्णिमा साजरी
🎬 Watch Now: Feature Video
वाराणसी : बुद्ध पौर्णिमा हा सण सगळीकडे साजरा केला जात आहे. वैशाखी पौर्णिमेला गौतम बुध्दांचा जन्म झाला होता. त्यामुळेच याला बौध्द पौर्णिमा सुध्दा म्हटले जाते. वाराणसीमध्ये बौध्द धर्माचे खुप मोठे स्थळ आहे. वाराणसीपासुन १० किमी अंतरावर सारनाथ येथे मुलगंध कुटी विहार आहे. बोधगया इथे बुध्दांना ज्ञानप्राप्ति झाली होती, त्यांनतर त्यांनी सारनाथ येथे पाच शिष्यांना बौध्द धर्माचा उपदेश दिला होता. ज्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखले जाते. बौध्द धर्मात चार पवित्र स्थळ आहेत. वाराणसी, लुंबिनी, बोधगया आणि कुशीनगर. सारनाथ हे बौध्द धर्मासह जैम धर्माचेही पवित्र स्थान आहे. वाराणसी येथुनच बौध्द धर्माच्या प्रचाराची सुरुवात झाली आहे, असे म्हटल्या जाते. सारनाथ येथील मुलगंध कुटी विहारात भगवान बुद्धांच्या अस्थि ठेवलेल्या आहेत, ज्या बौद्ध धर्मातील अनुयायांसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जातात. श्रीलंका, म्यांमार सह अनेक बौद्ध देशांतून मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्षु व अनुयायी इथे येतात.