बंगळुरू: गुंडाचा दुसऱ्या टोळीतील गुंडाकडून भररस्त्यात खून; सीसीटीव्हीत घटना कैद - सुहैल गुंड खून
🎬 Watch Now: Feature Video
बंगळुरू: विविध गुन्ह्यांत सहभागी असलेल्या गुंडाचा केजी हाळ्ळी पोलीस स्टेशन परिसराजवळ निर्घृण खून करण्यात आला आहे. सुहैल उर्फ लंगडा असे मृत्यू झालेल्या गुंडाचे नाव आहे. सराईत गुन्हेगार सुहैल याची नुकतीच हाळ्ळी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या दुसऱ्या टोळीबरोबर वाद झाला होता. त्याचवेळी दुसऱ्या टोळीने या गुंडाचा खून करण्याचा मनसुबा रचला होता, अशी चर्चा आहे. सुहैल हा मोदी रोडवरील डीजे हाळ्ळी परिसरातून जात होता. त्यावेळी दुसऱ्या टोळीमधील गुंडांनी सुहैलचा हत्यार व दगडाने खून केला. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
Last Updated : Apr 13, 2021, 2:28 AM IST