बर्फातून वाट काढत जवानांनी गर्भवती महिलेला दाखल केले रुग्णालयात - kashmir snowfall video
🎬 Watch Now: Feature Video
काश्मिर खोऱ्यात सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू असून रस्ते आणि महामार्ग बंद झाले आहेत. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत मदत मिळणेही अवघड होऊन बसले आहे. अशा परिस्थितीत लष्कराच्या जवानांनी सुमारे साडेतीन किलोमीटर पायी बर्फातून वाट काढत एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल केले. पाझलपोरा भागात महिला प्रसूती कळा येत असताना अडकून पडली होती. मात्र, जवांनानी स्ट्रेचवरून पायी तिला दुनिवार येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहचल्यानंतर महिलेने मुलाला जन्म दिला. काश्मिरातील तापमान कमालीचे खालावले आहे.