ग्रामीण भागातील सुरेल आम्रपालीची 'इंडियन आयडॉल'च्या अंतिम प्रवेश फेरीत धडक - आम्रपाली 'इंडियन आयडॉल
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13404202-thumbnail-3x2-nash.jpg)
येवला (नाशिक) - येवला सारख्या ग्रामीण भागात राहणारी आम्रपाली पगारे हिने सोनी मराठी टीव्हीवरील इंडियन आयडॉलच्या अंतिम प्रवेश फेरीत धडक मारली आहे. गायनाचे कोणतेही तंत्रशुद्ध शिक्षण न घेता तिने हा टप्पा गाठला आहे. तिच्या या प्रवासासाठी आता सामाजिक हात मदतीसाठी सरसावत आहेत. सावरगाव येथील न्यु इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात ती नववी वर्गात शिकते. वडील संगीत वाद्य वाजविण्याचा व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करत असतात. आम्रपाली सुद्धा लहानपणापासून वडींलासोबत जात असल्याने तिला गायनाची आवड लागली आहे. येथूनच तिच्या संगीताच्या प्रवासाला सुरुवात झाली.