असं एक गाव जिथं एकाही गुन्ह्याची नोंद नाही - सहरिया आसाम न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
लहान-मोठी गुन्ह्याची प्रकरणं बहुतेक सर्वव्यापी झाली आहेत. टीव्ही किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्ह्यांच्या बातम्या आपण रोजच वाचतो, पाहतो. लोक साधारणत: कोणताही गुन्हा घडला तर पोलिसांकडे जातात. त्यानंतर गुन्ह्याची तपासणी सुरू होते. मात्र, आसाममध्ये असं एक गाव आहे जिथं आजपर्यंत कधीही ग्रामस्थांना पोलिसांकडे जाण्याची गरज पडली नाही किंवा पोलिसांना गावात जाण्याची गरज पडली नाही. मध्य आसाममधील नागाव जिल्ह्यात वसलेल्या सहरिया गावातील नागरिकांनी कधीही पोलिसांचा चेहरा बघितलेला नाहीये. १९९८ साली बोडो समुदायाकडून स्थापन झालेल्या या गावात आत्तापर्यंत एकही गुन्हा घडलेला नाही. हत्या, दरोडा तर सोडाच पण चोरी सारखा गुन्हाही या गावात घडलेला नाही