सहा रुपयात चालणारी इलेक्ट्रिक सायकल! - कर्नाटक विद्यार्थी इलेक्ट्रिक सायकल निर्मिती न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे लोक सध्या इलेक्ट्रिक वाहनांबाबत विचार करत आहेत. कर्नाटकच्या गदग जिल्ह्यात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने अशाच प्रकारची एक इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. अवघ्या सोळा वर्षांच्या मुलाची ही कामगिरी पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. गदग जिल्ह्यातील वोक्कालगिरीमध्ये राहणाऱ्या प्रज्वल हबीबने कोणाच्याही मदतीशिवाय ही सायकल बनवली आहे. प्रज्वल सध्या डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला शिकतो. त्याने बनवलेली सायकल ही केवळ सहा रुपये खर्चात ३० ते ४० किलोमीटर दूर जाऊ शकते.