विद्यार्थ्यांना भाज्यांची माहिती देणारी सेंद्रीय परसबाग - बिहार शाळा सेंद्रीय परसबाग न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पटणा - बिहारमधील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात 'ओकेजी' अर्थात सेंद्रिय परसबाग विकसित करण्याच्या धोरणाला अनुसरून, शेरपूरमधील एका विद्यालयाने आदर्श निर्माण केला आहे. मुलांना शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे शेरपूरमधील हे प्राथमिक विद्यालय इतर विद्यालायांपेक्षा सरस ठरले आहे. या विद्यालयाचे मुख्याध्यापक अख्तर हुसैन आपल्या या प्रयोगामुळे सध्या चर्चेत आहेत. शेरपूरच्या प्राथमिक विद्यालयाने केवळ 'ओकेजी' धोरण लागू केले नाही तर बागेत उगवणाऱ्या भाज्यांच्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचेही काम केले आहे.