गणेश नाईकांना मंत्रिपद मिळताच कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडल्यानं मार्केटच्या छपराला आग; पाहा व्हिडिओ - AIROLI MARKET FIRE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 16, 2024, 7:58 AM IST
नवी मुंबई : महायुती सरकारचा भव्य-दिव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी कार्यक्रम रविवारी (15 डिसेंबर) नागपुरात पार पडला. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडं आपला नेता मंत्रिपदी विराजमान झाल्यामुळं महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. मात्र, उत्साही कार्यकर्त्यांनी वाजवलेल्या फटाक्यांमुळं आग लागल्याची घटना घडली आहे. ऐरोलीमध्ये हा प्रकार घडला आहे. भाजपाचे आमदार गणेश नाईक यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळं त्यांचे कार्यकर्ते ऐरोलीतील सेक्टर 15 मध्ये फटाके फोडत होते. यातील एक फटाका तेथील प्लाझा मार्केटवरील ताडपत्रीवर उडाल्यानं आग लागली. मात्र, अग्निशमन दलानं ही आग तत्काळ विझवल्यामुळं मोठी दुर्घटना टळली.