केरळ : ९ महिन्यांची गर्भवती महिला पुराच्या पाण्यातून रुग्णालयात दाखल - 9 month pregnant rescued in kerala
🎬 Watch Now: Feature Video
मल्लपूरम (केरळ) - मल्लपुरम येथे चलियार नदीला पूर आला आहे. अशा परिस्थितीत ९ महिन्याच्या गर्भवती महिलेला सुरक्षितपणे निलाम्बूर जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंधू असे मदत करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे
गर्भवती महिलेसाठी मदतकार्य हे बोटीने करण्यात आले. मदतकार्यात अग्नीशमन दलाचे जवान आणि स्वयंसेवक नागरी संरक्षकांनी सहभाग घेतला. चलियार नदीमध्ये पाण्याची पातळी वाढणार आहे. २०१९ मधील पुरामध्ये आदिवासी वस्तीमध्ये पूल वाहून गेला होता. त्यानंतर तात्पुरता बांधलेला पुलही वाहून गेला. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलेला सुरक्षितपणे हलविण्यात आले.