व्हिडिओ: जोरदार बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशातील तब्बल ४३१ रस्ते बंद, जनजीवन विस्कळीत - बर्फवृष्टी हिमाचल प्रदेश
🎬 Watch Now: Feature Video

राज्यातील डोंगराळ भागामध्ये मागील दोन दिवसांपासून होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या बर्फामुळे हिमाचल प्रदेशातील तब्बल ४३१ रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. सायंकाळपर्यंत १८१ रस्ते पुन्हा सुरू करण्यात आले. शिमला विभागातील सर्वात जास्त २३४ रस्ते बंद झाले होते. रस्त्यावरील बर्फ हटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.