Makai Sugar Factory : मकाई कारखान्याचे विनापरवाना गाळप ; साखर आयुक्तांनी ठोठावला 5 कोटी 63 लाख रुपयांचा दंड - Makai factory fined Rs 5 crore

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 16, 2022, 1:24 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

सोलापूर - करमाळा तालुक्यातील मकाई साखर कारखान्याला ( Fine to Makai Sugar Factory ) साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पाच कोटी 63 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. मकाई साखर कारखान्याकडे गाळप परवाना नसतानाही गाळप केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.मकाई साखर कारखान्याने गाळप ( Unlicensed Milling of Makai Sugar Factory ) हंगाम 2020-21 मधील शेतकऱ्यांची संपूर्ण एफआरपी न दिल्याने गाळप हंगाम साखर आयुक्तांनी मकाई कारखान्याचा गाळप परवाना नाकारला होता. कारखान्यास गाळप परवाना नसतानाही बेकायदेशीरपणे कारखान्याने गाळप सुरू केले. सदर साखर कारखान्याने 1 लाख 12 हजार 605 टन ऊसाचे विना परवाना गाळप केलेले आहे. मकाई सहकारी कारखान्याकडून विना परवाना गाळप केलेल्या ऊस गाळपावर 500 रुपये प्रति टन प्रमाणे पाच कोटी त्रेसष्ट लाख दोन हजार पाचशे या रकमेचा दंड ( Makai factory fined Rs 5 crore ) आकारला आहे. तसेच दंडाची रक्कम मकाई सहकारी साखर कारखान्याने आदेश दिल्यापासून 15 दिवसाच्या आत शासकीय कोषागारात भरावी, असा आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.