VIDEO : अंबडमध्ये विहिरीत पोहण्याच्या वादातून 20 वर्षीय तरुणाची हत्या; शहरात तणावपूर्ण शांतता - पोहण्याच्या वादातून जालन्यात हत्या
🎬 Watch Now: Feature Video
जालना - अंबडमध्ये विहिरीत पोहण्याच्या वादातून झालेल्या दोन मुलांमधील किरकोळ वादात एका 20 वर्षाच्या मुलाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रामेश्वर खरात ( 20 वर्ष ) असे मृत्यू मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मृत मुलाच्या काकाच्या तक्रारीवरुन अंबड पोलीस ठाण्यात 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावे, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. शिवाय घटनेचा निषेध म्हणून शहरात मोर्चाही काढण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST