Rescued the Dog from Hill : दरीत अडकलेल्या श्वानाची सर्पमित्राकडून सुटका, पहा व्हिडिओ - Rudra Nag Kullu

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 4, 2022, 5:10 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

कुल्लू ( शिमला ) - हिमाचल प्रदेशात कुल्लू जिल्ह्यातील मणिकरण खोऱ्यात रुद्रनागमध्ये डोंगरावर अडकलेल्या श्वानाला वाचविल्याची घटना समोर आली आहे. कुल्लू जिल्ह्यातील प्रसिद्ध सर्पमित्र सोनू ठाकूर यांनी डोंगरावरून खाली उतरून श्वानाला (Sonu Thakur rescued the dog) वाचवले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (snake catcher sonu thakur)  आहे. लोक सोनू ठाकूर यांचे खूप कौतुक करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की कुत्रा डोंगरावर अडकला आहे. हा श्वान वर येऊ शकत नाही. श्वानाच्या समोरून नदी वाहत आहे. अशा परिस्थितीत सोनू ठाकूर यांनी जीव धोक्यात घालून श्वानाची सुखरूप सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लूच्या खीरगंगा ट्रॅकच्या मार्गावर रुद्रनाग मणिकर्ण नावाचे ठिकाण आहे. येथे सोनू ठाकूर आपल्या कुटुंबासह खीरगंगा ट्रॅकवर गेले होते. सोनू ठाकूर यांनी श्वानाची सुटका करून मानवतेचा आदर्श ठेवला आहे. याआधी सोनू ठाकूर यांनी लोकांच्या घरातून 600 हून अधिक सापांची सुटका करून त्यांना सुरक्षित जंगलात सोडले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.